gram news
Аватар канала ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

@obc_aks

Official Account| असून हे संघटन केंद्रीय तथा राज्य शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांचे गैरराजनैतिक आहे.

ПроектыHI

121подписчиков

Открыть канал

Последние посты

  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    7 авг., 02:11

    मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात मंडल योद्ध्यांना विनम्र अभिवादन!आजचा दिवस केवळ मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा दिवस नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय, समता, प्रतिनिधित्व आणि समान संधीच्या अधिकारांचा विजयदिन आहे.मंडल आयोगामुळे इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला शिक्षण, रोजगार आणि शासन-प्रशासनात घटनात्मक प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला झाला. हा अधिकार सहज मिळाला नाही; त्यासाठी अनेक विचारवंत, समाजसुधारक, लोकनेते आणि लाखो कार्यकर्त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला.मंडल आयोग हा केवळ २७% आरक्षणाचा विषय नव्हता, तर सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या समाजाला संविधानाने दिलेल्या प्रतिनिधित्वाच्या हक्काची ऐतिहासिक मान्यता होती. त्यामुळे मंडल हा एका आयोगाचा इतिहास नसून सामाजिक न्यायाच्या नव्या युगाचा प्रारंभ आहे. #MandalDay #MandalCommission #OBC #SocialJustice #ConstitutionRights OBCAdhikariKarmchariSangh
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    5 июл., 02:47изменён

    मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे, सामाजिक न्यायाचे प्रखर पुरस्कर्ते आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! १९९० मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्या काळात देशाचे राजकारण एका निर्णायक वळणावर उभे होते. एका बाजूला काही राजकीय पक्ष आणि संघटना धार्मिक व सांप्रदायिक ध्रुवीकरणाचा अजेंडा पुढे नेत होते, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे रामविलास पासवान आणि शरद यादव यांसारखे नेते मागास, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या भविष्याचा लढा लढत होते. केंद्रीय समाजकल्याण मंत्री म्हणून रामविलास पासवान यांनी मंडल आयोगाच्या शिफारशींच्या प्रभावी अंमलबजावणीत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इतर मागासवर्गीय (OBC) समाजाच्या जातीय याद्यांचे पडताळणी व समन्वय, तसेच केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि
    OBC अभियानओबीसी सभासद नोंदणी अभियानओबीसी सभासद नोंदणी अभियानाचे अधिकृत संकेतस्थळ. नोंदणी करा आणि अभियानाचा भाग व्हा.
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    5 июл., 02:47

  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    1 июл., 03:23

    ओबीसींचे मसीहा शरद यादव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!मंडल आयोग हा केवळ एक सरकारी अहवाल म्हणून न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन सामाजिक समावेशकतेचे व्यापक मंच निर्माण करण्यात शरद यादव यांचा मोलाचा वाटा आहे.ओबीसी चळवळीला राष्ट्रीय राजकारणात मानाचं आणि निर्णायक स्थान मिळवून देणारे ते एक अग्रगण्य नेतृत्व होते. सामाजिक न्याय, समता आणि हक्कांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या कार्यामुळे कोट्यवधी वंचित घटकांना आत्मसन्मान आणि संधीचं दार खुलं झालं.ते ओबीसी वर्गाचे कट्टर हिमायती आणि सर्वसमावेशक समाजवादाचे खरे समर्थक होते. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत त्यांनी “जातीनिहाय आरक्षण”ची मागणी पुढे रेटली आणि २०११ मध्ये आर्थिक-सामाजिक वर्गवारीवर आधारित जनगणनेसाठी सरकारला भाग पाडलं. #SharadYadav #socialjustice #Womenequality #MandalCommission #OBCAdhikariKarmchariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    1 июл., 02:59

    ओबीसींचे मसीहा शरद यादव यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!मंडल आयोग हा केवळ एक सरकारी अहवाल म्हणून न राहता, त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन सामाजिक समावेशकतेचे व्यापक मंच निर्माण करण्यात शरद यादव यांचा मोलाचा वाटा आहे.ओबीसी चळवळीला राष्ट्रीय राजकारणात मानाचं आणि निर्णायक स्थान मिळवून देणारे ते एक अग्रगण्य नेतृत्व होते. सामाजिक न्याय, समता आणि हक्कांसाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्यांच्या कार्यामुळे कोट्यवधी वंचित घटकांना आत्मसन्मान आणि संधीचं दार खुलं झालं.ते ओबीसी वर्गाचे कट्टर हिमायती आणि सर्वसमावेशक समाजवादाचे खरे समर्थक होते. महिला आरक्षण विधेयकाच्या चर्चेत त्यांनी “जातीनिहाय आरक्षण”ची मागणी पुढे रेटली आणि २०११ मध्ये आर्थिक-सामाजिक वर्गवारीवर आधारित जनगणनेसाठी सरकारला भाग पाडलं. #SharadYadav #socialjustice #Womenequality #MandalCommission #OBCAdhikariKarmchariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    30 июн., 03:00

    न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!भारतीय न्यायव्यवस्थेतील एक निर्भीड, प्रामाणिक आणि लोकशाही मूल्यांशी बांधील असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीदरम्यान इंदिरा साहनी (मंडल) प्रकरणाच्या संदर्भात न्यायमूर्ती सावंत यांनी स्पष्ट केले होते की, घटनेच्या कलम १६ (४) अंतर्गत 'मागास वर्ग' ओळखण्यासाठी आर्थिक निकष लावता येत नाहीत. मागासलेपणाचे मूळ कारण हे त्यांचे 'सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा' हेच असते. आरक्षण हे केवळ सवलत नसून ऐतिहासिक विषमता दूर करून समान संधी निर्माण करण्याचे संविधानिक साधन आहे. हा सामाजिक न्यायाचा व्यापक विचार त्यांनी अधोरेखित केला. #JusticePBSawant #SocialJustice #HumanRights #MandalCommission #ConstitutionalValues #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा:
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    26 июн., 02:00

    लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे, बहुजन समाजाच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान समाजसुधारक म्हणजे राजर्षी शाहू महाराज.शिक्षण, शेती, उद्योग आणि सामाजिक सुधारणा यांना प्राधान्य देत त्यांनी एका न्याय्य आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीचा आदर्श घालून दिला. दीन-दुबळे, वंचित आणि शोषित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य ऐतिहासिक आहे. आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रतिनिधित्वाची संकल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी सामाजिक समतेच्या दिशेने क्रांतिकारी पाऊल उचलले."बहुजन हिताय, बहुजन सुखाय" या विचारांचा वारसा जपणाऱ्या या लोककल्याणकारी राजाचे कार्य आजही प्रत्येक पिढीला प्रेरणा देते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना व कार्याला कोटी कोटी प्रणाम! #ShahuMaharaj #SocialJustice #Equality #Samata #ConstitutionalValues #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    14 мая, 01:30

    अथांग विद्वत्ता, अढळ स्वाभिमान, अपराजित शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणारे छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर राष्ट्रनिष्ठा, त्याग आणि संघर्षाचे जाज्वल्य प्रतीक होते. छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #SambhajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Swarajya #Rakshak #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    11 мая, 03:19

    महात्मा ज्योतिराव फुले “महात्मा” पदवी प्रदान दिन!सत्य, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणारे स्त्री-शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीचे महानायक, सत्यशोधक विचारांचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना सन ११ मे १८८८ मध्ये मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे जनतेतर्फे “महात्मा” ही पदवी प्रदान करण्यात आली.ही केवळ पदवी नव्हती तर अन्याय, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था आणि सामाजिक गुलामगिरीविरुद्ध त्यांनी पेटवलेल्या क्रांतीचा जनतेने केलेला गौरव होता. मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना, शेतकरी, कामगार आणि वंचितांच्या हक्कांसाठी संघर्ष या कार्यातून त्यांनी भारताला समतेचा नवा विचार दिला. महात्मा पदवी प्रदान दिनानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन! #MahatmaPhule #महात्मा #सत्यशोधक #SocialJustice #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    3 мая, 01:41

    हमीद दलवाई यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!अंधश्रद्धा, धर्मांधता आणि सामाजिक विषमतेविरुद्ध निर्भीड आवाज उठवणारे, मुस्लिम समाजात सुधारणा, स्त्री-स्वातंत्र्य आणि प्रबोधनाची मशाल पेटवणारे प्रखर विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक — हमीद दलवाईत्यांनी केवळ प्रश्न उपस्थित केले नाहीत, तर विचार करण्याची नवी दिशा दिली. धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावादी.मूल्यांचा पुरस्कार करत समाजाला आत्मपरीक्षणाची गरज त्यांनी दाखवून दिली. त्यांचा संघर्ष हा कोणत्याही एका समाजापुरता मर्यादित नव्हता, तो होता समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठीचा व्यापक लढा. #HamidDalwai #SocialReform #ScientificTemper #Secularism #SocialJustice #ReformMovement #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    1 мая, 04:26

    महाराष्ट्र दिन | मराठी राजभाषा दिन | आंतरराष्ट्रीय कामगार दिन | बौद्ध पौर्णिमा१ मे हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना (1960) झाली. मराठी अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस.मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपली ओळख, संस्कृती आणि विचारांची परंपरा आहे. तिचे जतन व संवर्धन हीच आपली जबाबदारी आहे.आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ही साजरा केला जातो. हा दिवस जगभरात कामगार वर्गाच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी (जसे की सुरक्षित कामाची जागा, योग्य वेतन) साजरा केला जातो.तसेच आजच बौद्ध पौर्णिमा— तथागत गौतम बुद्ध यांच्या जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा स्मरणदिन. जगाला करुणा, प्रज्ञा आणि समतेचा मार्ग दाखवणारे, अहिंसा, मध्यम मार्ग आणि मानवी मूल्यांचे अधिष्ठान निर्माण करणारे तथागत गौतम बुद्ध यांना बौद्ध पौर्णिमेनिमित्त कोटी कोटी वंदन! “अप्प दीपो भव” — स्वतःचा दीप स्वतः बना, हा संदेश आजही अंधःकारात
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    30 апр., 06:44

    या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे… हे सर्व पंथ, संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे…राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातिभेद विरोधात प्रबोधन केले. 'ग्रामगीता' आणि भजनांतून त्यांनी मानवी मूल्ये, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक समतेचा संदेश दिला. चुकीच्या रूढी, अंधश्रद्धा व दांभिक भक्ती न करता, मानवामध्येच देव शोधावा, असा विचार त्यांनी आपल्या भजनांतून मांडला. समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #RashtrasantTukdojiMaharaj #Gramgeeta #SocialReformer #ScientificTemper #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    28 апр., 02:23

    जागतिक कामगार सुरक्षा व आरोग्य दिनकामगार हा केवळ श्रमिक नसतो, तो राष्ट्राच्या प्रगतीचा खरा शिल्पकार असतो. कारखाने, बांधकाम, शेती, उद्योग, सेवा क्षेत्र… प्रत्येक ठिकाणी आपल्या श्रमाने देश उभा करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची हमी देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.अपघातमुक्त कार्यस्थळ, सुरक्षित साधने, योग्य प्रशिक्षण आणि आरोग्यदायी वातावरण हे केवळ नियम नाहीत, तर मानवी हक्क आहेत. त्यामुळे प्रत्येक कामगारासाठी सुरक्षित कार्यस्थळ, आरोग्याची हमी आणि सन्मानाची वागणूक व श्रमाचा आदर आणि हक्कांचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी सजग, संवेदनशील आणि कटिबद्ध राहूया. #WorldDayForSafetyAndHealthAtWork #WorkerSafety #LabourRights #SafeWorkplace #HealthyWorkplace #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    27 апр., 06:54

    इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरूसामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास (OBC) घटकातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध करून देते. आर्थिक अडचणीमुळे परदेशात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक उज्ज्वल भविष्याचा मार्ग ठरू शकते. महाराष्ट्र शासनाची ही विदेशी शिष्यवृत्ती योजना ही केवळ आर्थिक मदत नसून, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या दारात प्रवेश मिळवून देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओबीसी अधिकारी कर्मचारी संघच्यावतीने करण्यात येत आहे. शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी👇🏻लिंकवर क्लिक करावे. https://obcadhikarikarmacharisangh.com/?p=4342 #OBCScholarship #StudyAbroad #Maharashtra #Scholarship2026 #VJNT #SBC #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्स
    OBC Adhikari Karmachari Sanghइतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्तीकरिता अर्ज प्रक्रिया सुरू - OBC Adhikari Karmachari SanghOBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज सुरू. पात्रता, अटी, अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख जाणून घ्या.
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    23 апр., 02:25

    समाजातील अस्पृश्यतेच्या अंधाराविरुद्ध प्रबोधनाची मशाल पेटवणारे… मानवतेच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून समता आणि बंधुतेचा मार्ग दाखवणारे… व अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसुधारक, अभ्यासू संशोधक आणि प्रभावी लेखक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी सुरू केलेली अस्पृश्यता निवारण चळवळ ही केवळ सामाजिक सुधारणा नव्हती तर ती होती मानवतेच्या सन्मानासाठीची एक क्रांती. #VitthalRamjiShinde #SocialReformer #UntouchabilityAbolition #HumanityFirst #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    19 апр., 02:00

    समतावादी विचारांचे प्रवर्तक, मानवतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!ज्या काळात समाज जात, भेदभाव आणि अन्यायाच्या अंधारात अडकला होता, त्या काळात समता, श्रमाची प्रतिष्ठा आणि मानवतेचा विचार रुजवणारे महान समाजसुधारक म्हणजे महात्मा बसवेश्वर.“कायाकवे कैलास” या तत्त्वज्ञानातून त्यांनी कामाला पूजेसमान मान देत समानतेवर आधारित समाजरचना घडवण्याचा मार्ग दाखवला. स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धाविरोध, सामाजिक न्याय आणि बंधुतेचा संदेश देत त्यांनी समाज परिवर्तनाची क्रांती उभी केली. #Basaveshwara #SocialReform #Equality #Humanity #KayakaveKailasa #SocialJustice #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    17 апр., 09:36

    मंडलनायक कर्मवीर ॲड. जनार्दन पाटील स्मृतिदिन विनम्र अभिवादन!ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे, राज्यात ओबीसी चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे, मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि मुस्लिम ओबीसी चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाणारे कर्मवीर ॲड. जनार्दन पाटील हे खरेच सामाजिक न्यायाच्या लढ्यातील अढळ दीपस्तंभ होते. स्वतःचे वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवून, अविवाहित राहून त्यांनी संपूर्ण जीवन ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी आणि हक्कांसाठी समर्पित केले. #AdvJanardanPatil #OBCMovement #MandalCommission #SocialJustice #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    14 апр., 02:13

    “क्रांती म्हणजे गुलामगिरीची साखळी तोडणे नव्हे तर ती साखळी पुन्हा निर्माण होऊ नये याची व्यवस्था करणे!” — डॉ. बाबासाहेब आंबेडकरज्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही, तर त्या अन्यायाची मुळेच उपटून टाकण्यासाठी संविधान, समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाची भक्कम पायाभरणी केली… वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाला मान, हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देणारे विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! जय भीम! जय संविधान! #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #SocialJustice #Equality #ConstitutionofIndia #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक: https://obcadhikarikarmacharisangh.in व्हाट्सएप चॅनेल फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va93Bi159PwPD2lH3D0G
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    13 апр., 02:24

    मंडल आयोगाचे अध्यक्ष, सामाजिक न्यायाच्या लढ्याचे दूरदर्शी शिल्पकार मा. बी. पी. मंडल यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!भारतातील सामाजिक रचनेतील असमानतेला ओळखून, वंचित, मागास आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वैज्ञानिक अभ्यास, सामाजिक वास्तव आणि संविधानिक मूल्यांवर आधारित मंडल आयोगाचा अहवाल तयार करणारे महान व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्यामुळे समाजातील मोठ्या घटकाला प्रतिनिधित्व, संधी आणि सन्मानाचा मार्ग मिळाला. मंडल आयोग हा केवळ अहवाल नव्हता, तो सामाजिक न्यायाचा दस्तऐवज आणि परिवर्तनाचा पाया होता. आजही समता, अधिकार आणि प्रतिनिधित्वाच्या प्रत्येक लढाईत बी. पी. मंडल यांचे विचार दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या स्मृतिदिनीसामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प करूया. #BPMandal #MandalCommission #SocialJustice #OBCMovement #ConstitutionRights #OBCAdhikariKarmachariSangh ओबीसी अधिकारी कर्मचारी संघसोबत जॉईन👇🏻व्हा! सभासद नोंदणी लिंक:
  • ओबीसी अधिकारी कर्मचारी संघ

    11 апр., 01:54

    राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!जातीय भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्यायाच्या अंधारात सत्य, शिक्षण आणि समानतेची ज्योत पेटवणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी मागासवर्गीय, शूद्र-अतिशूद्र आणि वंचित समाजाच्या उद्धारासाठी ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून सामाजिक क्रांतीची ठिणगी चेतवली.अस्पृश्य मानल्या गेलेल्या मुला-मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षणाचा हक्क सर्वांसाठी खुला केला. स्वतःच्या घरातील पाण्याची टाकीही सर्वांसाठी खुली करून मानवतेचा खरा अर्थ जगासमोर ठेवला. स्त्री शिक्षणाचा पाया रचत पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना घडवून भारतातील पहिल्या महिला शिक्षिका निर्माण केल्या.बालविवाहाला विरोध, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा आणि बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापून समाज सुधारण्याचा नवा अध्याय लिहिला. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात होत आहे. चला, या वर्षात त्यांच्या विचारांना घराघरात, मनामनात पोहोचवण्याचा संकल्प करूया. समता, शिक्षण आणि
Скачать ряд в CSV
Бот обратной связи для своего канала — бесплатно

Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.

Как это работает →
Создать бота