Последние посты

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
21 сент., 13:09
🔴पाऊस पडल्यास त्यानंतरचे खरीप पिकांचे व्यवस्थापन🔴 या महत्त्वाच्या विषयावर लाईव्ह होणार असून सर्वानी लाईव्ह आवर्जून बघावे.👇🏻 https://www.youtube.com/live/kexpR9vPWOo?si=73zRc59t9GzMcjvjYouTubeपाऊस पडल्यास त्यानंतरचे खरीप पिकांचे व्यवस्थापनसोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " पाऊस पडल्यास त्या नंतरचे खरीप पिकांचे व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवानी Live पाहावे व आपले काही प्रश्न…1,330Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
21 сент., 09:15
🌱तुरीबद्दल माहिती🌱 👉 खतांचा वापर: पाऊस पडल्यास या अगोदर खताचा वापर केला नसल्यास, चांगला ओलावा जर असेल तर रासायनिक खताचा आपण तिथे वापर करू शकतो. त्यामध्ये २०:२०:०:१३ किंवा शक्यतो २४:२४:०:८ + पोटॅश अशी खते वापरावीत.👉 फायटोप्थोरा ब्लाइट नियंत्रण: तुरीवरील खोडावरील डाग हे फायटोप्थोरा ब्लाइटचे लक्षण आहेत. त्या ठिकाणी भविष्यात फांद्या मोडून झाडे वाळू शकतात. यासाठी खोडावर आपल्याला क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल गोल्ड ४० ग्रॅम प्रति पंप याचा खोडावर फवारा देणे अत्यंत गरजेचे आहे. तो न चुकता खोडावर डाग असल्यास द्यावा.👉 फ्युझॅरियम व्हिल्ट (मर रोग): फ्युझॅरियम व्हिल्ट म्हणजे मर जी आहे, ती फुले लागल्यानंतर जे झाडे मरतात, त्याच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'ट्रायकोडरमा' या जैविक बुरशीनाशकाचा ड्रेनचिंगद्वारे (आळवणीद्वारे) वापर करावा.👉 शेंडे खुडणे: तुरीचे शेंडे खुडणे ७५ दिवसांपर्यंत करू शकता. ज्या ठिकाणी शेंडे खुडणी झाली नाही, अशा शेतकऱ्यांना जमिनीत ओलावा असल्यास शेंडे खुडणी करू शकता; मात्र1,650Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
21 сент., 09:15
🟢 श्री गजानन जाधव यांचा महत्वाचा कृषी सल्ला 🟢🌱सोयाबीन बद्दल माहिती🌱 या आठवड्यात काही जागी चांगला, कुठे मध्यम व काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याने, पाऊस पडल्यास सोयाबीनचे नियोजन कसे करावे?👉 हलकी जमीन व कोरडवाहू असलेल्या बहुतांश ठिकाणी सोयाबीन सुकले आहे किंवा पिवळे पडले असल्याने, अशा ठिकाणी आता काही फारसा खर्च करणे योग्य नाही. फक्त अशा ठिकाणी सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव असल्यास व सोयाबीन हिरवे असल्यास 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' हे अळीनाशक फवारावे व त्यासोबतच १३:०:४५ या विद्राव्य खताचा वापर करू शकता.👉 भारी जमिनीतील किंवा सिंचन केलेल्या सोयाबीनमध्ये पाऊस पडल्यानंतर थोडा खर्च करण्यास हरकत नाही. अशा ठिकाणी अळीनाशक 'व्हिटारा प्लस' किंवा 'सिंजो' यासोबत एक बुरशीनाशक 'नॅझो सुपर' किंवा 'विसल्फ' अधिक दाणा भरण्यासाठी १३:०:४५ व 'भरारी'चा फवारणीत वापर करू शकता.👉 या वर्षाच्या आपल्या प्रमुख शिफारसी व त्यांचा परिणाम:✅ पहिली शिफारस: आम्ही जिल्ह्यानुसार वाणांची निवड सांगितली1,610Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
21 сент., 05:56
https://youtu.be/uYkjQO5YLD0YouTubeकमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस कुठे व किती ? #हवामानअंदाज २१ सप्टेंबर २०२६🌦हवामान अंदाज 🌦 👉 सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे बहुतांश विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 👉 ज्यामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील जिल्हे जसे गोंदिया, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव…1,740Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
21 сент., 05:09
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक: २१ / ०९ / २०२६🌦हवामान अंदाज 🌦 👉 सध्या बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे बहुतांश विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 👉 ज्यामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील जिल्हे जसे गोंदिया, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्यम ते चांगल्या पावसाची आशा असून, त्या बाजूच्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नागपूर, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे इत्यादी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 👉 उत्तरेकडील खानदेशात मात्र पावसाची शक्यता कमी आहे. 👉 याचबरोबर शेजारच्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. 👉 मान्सूनने १९ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानमधून माघार घेतली आहे व राज्यातून सुद्धा २७ सप्टेंबरनंतर कधीही मान्सून माघारी फिरेल. 👉1,820Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
14 сент., 08:45
https://youtu.be/eW1lD7WkWwIYouTubeविखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस ! #हवामानअंदाज १४ सप्टेंबर २०२६🌦हवामान अंदाज🌦 या आठवड्यात कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही. मात्र, काही ठिकाणी मेघगर्जनासह विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून प्रामुख्याने पूर्व विदर्भात याचे प्रमाण बरे असून…4,360Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
14 сент., 06:34
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर 🔴 दिनांक : १४ / ९ / २०२६🌦हवामान अंदाज🌦 या आठवड्यात कोणत्याही कमी दाबाच्या पट्ट्याची शक्यता नसल्याने सार्वत्रिक दमदार व दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही.मात्र, काही ठिकाणी मेघगर्जनासह विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून प्रामुख्याने पूर्व विदर्भात याचे प्रमाण बरे असून राज्यातील इतर भागात फारशा पावसाची या आठवड्यात शक्यता नाही.१५ सप्टेंबरदरम्यान मान्सूनचा पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊ शकते. मात्र, महाराष्ट्रातून मान्सून कधी परतेल व परतीच्या प्रवासात पाऊस पडेल की नाही याबाबत सध्या सांगता येत नाही. अंदाज आल्यावर याबाबत कळवू.आम्ही शिफारस करत असलेल्या फवारणीच्या औषधांचे प्रमाण हे २० लिटरच्या पंपाचे असून, पंप बदलल्यास किंवा प्रमाण बदलल्यास औषधांचे प्रमाण बदलावे. तसेच, फवारणी करताना विषबाधा होणार नाही याबाबत आवश्यक काळजी घ्यावी.4,180Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
11 сент., 05:17
https://youtu.be/BVpxdWEqxm8YouTubeसध्याच्या हवामान अंदाजानुसार, एका सौम्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात काही प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. 🌧️ पूर्व विदर्भात पुढील तीन दिवसांत म्हणजेच शुक्रवार, शनिवार आणि रविवार पावसाचे प्रमाण वाढू शकते. ☁️ त्यासोबतच पश्चिम विदर्भ आणि…5,350Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
11 сент., 05:12
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक : ११ सप्टेंबर २०२६🌦सुधारित हवामान अंदाज🌦 👉 सध्याच्या अंदाजानुसार एका सौम्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील हवामानात थोडे बदल दिसून येत आहेत. ज्यामुळे पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण पुढील तीन दिवसांत म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवारपर्यंत वाढू शकते व सोबतच पश्चिम विदर्भ व लगतच्या मराठवाड्यात सुद्धा ढगाळ हवामानात वाढ होऊन मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. 👉 परंतु हा डायरेक्ट तीव्र कमी दाबाचा पट्टा नसल्यामुळे तूट भरून काढेल एवढा पाऊस नसेल. मात्र मोठ्या खंडानंतर यामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. 👉 शुक्रवार, शनिवार आणि रविवार दिनांक ११, १२ व १३ पूर्व विदर्भात बऱ्यापैकी, पश्चिम विदर्भात व लगतच्या मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.4,900Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
7 сент., 08:45
https://youtube.com/live/POYp-R1o-6A?feature=shareYouTubeसध्य परिस्थितीनुसार प्रश्न तुमचे, उत्तर आमचेसोमवार दिनांक 07 सप्टेंबर 2026 श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सध्य परिस्थितीनुसार प्रश्न तुमचे, उत्तर आमचे " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बंधूंनी Live पाहावे व काही प्रश्न असल्यास कॉमेंट…6,350Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
7 сент., 07:33
https://youtu.be/AAabUCjNJn4YouTube12 सप्टेंबर नंतर हवामानात बदल ? #हवामानअंदाज 07 सप्टेंबर 2026🌦🌦हवामान अंदाज🌦🌦 शनिवार दिनांक १२ सप्टेंबरपर्यंत आहे तसंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. सध्या शनिवारपर्यंत कुठलाही कमी दाबाचा पट्टा सक्रिय नसल्यामुळे सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार हलका पाऊस काही ठिकाणी…5,310Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
7 сент., 07:11
🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴 दिनांक : ७ सप्टेंबर २०२६🌦🌦हवामान अंदाज🌦🌦 शनिवार दिनांक १२ सप्टेंबरपर्यंत आहे तसंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. सध्या शनिवारपर्यंत कुठलाही कमी दाबाचा पट्टा सक्रिय नसल्यामुळे सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणाऱ्या पावसाची शक्यता नाही. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार हलका पाऊस काही ठिकाणी पडू शकतो.शनिवारनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, मात्र आजच त्याबद्दल खात्रीशीर सांगणं योग्य नाही. त्यामुळे गुरुवार दिनांक १० सप्टेंबरला पुढचा अंदाज दिला जाईल.आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांचं प्रमाण हे २० लिटरच्या पंपाचं असून, पंप बदलल्यास त्यानुसार औषधाचं प्रमाण बदलावं. विषबाधा होणार नाही यासाठी फवारणी करताना पुरेपूर काळजी घ्यावी.5,230Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
7 сент., 04:48
4,710Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
5 сент., 12:50
🔴🔴🔴 नम्र निवेदन 🔴🔴🔴आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात, आपण बूस्टर चे सोयाबीन, कापुस, मका, तूर कोणतेही पिकाची पेरणी केली असल्यास उभ्या पिकात उभे राहून आपणास त्या वाणाबद्दल काय वाटते, कंपनी बद्दल आपले काय मत आहे असे थोडक्यात 90 सेकंद चे व्हिडिओ बनवून आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्स ॲप स्टेटस वर पाठवून सहकार्य करावे. आपण नक्की छान व्हिडिओ बनवून सगळीकडे व्हायरल कराल अशी मला खात्री आहे.सदैव आपला ऋणीगजानन जाधव.5,010Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
4 сент., 06:01
5,430Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
4 сент., 06:01
5,320Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
4 сент., 06:01
5,340Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
3 сент., 05:35
https://youtube.com/live/v5JylCUtd1c?feature=shareYouTubeहळद व अद्रक सध्द परिस्थितीतील व्यवस्थापनगुरुवार दि. 03 सप्टेंबर 2026 रोजी , श्री विलास चित्रकार सर आपल्याशी " हळद व अद्रक सध्द परिस्थितीतील व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक 7 वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स…5,010Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
31 авг., 13:30
https://www.youtube.com/live/jJVXlshehJQ?si=i5fCzxxgZdi5QPtWYouTubeसोयाबीन, कापूस, तुरीचे या पुढील व्यवस्थापनसोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 श्री गजानन जाधव सर आपल्याशी " सोयाबीन, कापूस, तुरीचे या पुढील व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बंधूंनी Live पाहावे व काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स…5,520Открыть в Telegram
व्हाईट गोल्ड ट्रस्ट, छत्रपती संभाजीनगर (White Gold Trust, Chatrapati Sambhajinagar)
31 авг., 07:47
🌱तुरीबद्दल माहिती🌱 👉 या वर्षी तुरीचा पेरा वाढला आहे सध्या तुरीची अवस्था वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. 👉 खोडावर डाग पडून फांद्या व नंतर झाड वाळणे याला फांदीमर किंवा फायटोप्थोरा असे म्हणतात. या रोगाला थांबवण्यासाठी खोडावर रिडोमिल गोल्ड किंवा क्रिप्टॉक्स (म्हणजे मेटलॅक्सिल + मँकोझेब) या संयुक्त बुरशीनाशकाचा दाट फवारा अवश्य द्यावा. जमिनीत ओलावा असल्यास काही औषध जमिनीवर सुद्धा पडेल असे फवारावे. या रोगाचा प्रादुर्भाव नसल्यास भविष्यातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक ट्रायकोडर्माची आळवणी करावी. 👉 तुरीला फांद्याची संख्या जास्त असल्यास उत्पादनात वाढ होते. त्यामुळे योग्य वाढ असल्यास तुरीचे 25, 50 व 75 दिवसाला शेंडे खुडावे. दोन वेळा शेंडे खुडायचे असल्यास 30-60 दिवसादरम्यान व एकाच वेळेस शेंडे खुडायचे असल्यास 75 दिवसापर्यंत कधीही एकदा शेंडे खुडू शकता. 👉 पानांचे गुच्छ होऊन त्या झाडात जास्त हिरवेपणा राहून फुलं व शेंगा न लागणे म्हणजे हा रोग वांझ रोग आहे, म्हणजे स्टेरिलिटी मोझॅक. याचा5,340Открыть в Telegram
Подписчики пишут боту, вы отвечаете реплаем, ваш аккаунт скрыт. Создаётся в одно касание.
Как это работает →