Latest posts

मुक्तचिंतन
12 Nov 2023, 02:20
बहिणभावाचा पवित्र सण म्हणजे दिवाळी. स्त्रीकडे बघण्याची नजर पवित्र असेल, तर अवघं वातावारण मंगलमय होतं. सर्व सणांचे प्रयोजन प्रसन्नता आणि आणि आनंद हेच आहे. नकरात्मकतेचा नरकासूर सकारात्मकतेच्या तेजाने नष्ट करावा. ज्यांची दिवाळी अंधारात आहे, त्यांच्याही झोपडीत एखादा आशेचा दिवा लावावा. आपल्या आनंदाची आभा प्रभातीच्या रविकिरणाप्रमाणे भवताल उजळीत जावी. प्रसन्नतेने विषण्णतेचा तिमिर दूर करावा. माऊली म्हणतात, देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2022/10/bring-diwali-in-life.htmlMuktchintanचला आयुष्याची दिवाळी करूयाbring-diwali-in-life, चला आयुष्यात दिवाळी आणूया, दिवाळी कशी साजरी करावी, दिवाळी म्हणजे काय, what is diwali, what is significance of diwali, diwali
मुक्तचिंतन
27 Apr 2023, 00:35
नक्की वाचा, आवडल्यास शेअर करा.
मुक्तचिंतन
27 Apr 2023, 00:34
दिव्याचा प्रकाश हवा असेल, तर आधी धुराची पीडा सहन करावी लागते. औषध शेवटी हितकारक ठरणारं असलं, तरीही ते सेवन करताना जिभेला त्रास होतो. अमृताचा सागर मिळवायचा असेल, तर तात्पुरत्या संकटांकडे डोळेझाक करा. ज्ञानेश्वरीत याचे खूप गोड वर्णन आले आहे. माऊली म्हणतात, ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु । मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा ॥संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇🏻https://bit.ly/442TZb9Muktchintanशेवटाचा विचार कराशेवटाचा विचार करा, start with keeping end in the mind, how to work mindfully, how to be proactive, how to complete the work, ramesh wagh, muktchintan
मुक्तचिंतन
12 Sept 2022, 05:05

मुक्तचिंतन
12 Sept 2022, 05:04
त्यामुळे जर आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीच्या स्मरणाने बदल होणार असेल, तर तो बदल कसा असावा, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. रामाचं स्मरण केलं तर रामाचे गुण संक्रमित होतील, कृष्णाचं चिंतन केलं तर कृष्ण व्हाल. जगदंबेच स्मरण केलं तर अंतरी जगदंबा संचरेल. याऊलट एखाद्या वाईट गोष्टीचं स्मरण केलं तर वाईटाचा संसर्ग होईल. आता तुम्ही म्हणाल नामस्मरण मनाच्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे इथपर्यंत ठीक. पण मग दररोज नियमित नामस्मरणाची काय आवश्यकता? कारण मानवाचा स्वभावच मूलत: स्खलनशील आहे. मन चंचल आहे. मूळ स्वरूपाचा विसर पडला की मोठमोठ्या तपस्वी ऋषींचाही अध:पात झालेला आहे. नामस्मरणाने विवेक जागा राहतो. स्वभाव विनम्र बनतो. नामधारक फळभाराने लगटलेल्या झाडाच्या फांदीप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे नम्र होतात. उंचावरून पडलेलं पाणी जसं उताराकडं आपोआप वाहतं, तसं भेटेल त्याला ते नमस्कार करतात. भावाने, प्रेमाने. भावार्थ दीपिकेमध्ये माऊली म्हणतात, अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती । जे जयजय
मुक्तचिंतन
12 Sept 2022, 05:04
नियमित नामस्मरण का करावे? रमेश वाघ, नाशिक, 9921816183 ----------------------------------------------- प्रसंग एक. आमच्या तात्यांच्या पायाचे ऑपरेशन झाल्याचे कळले, म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. तात्या झाडाखाली बाज टाकून बसले होते. मी सहज विचारलं, "तात्या काय उद्योग चाललाय?" तात्या म्हणाले, "कसलं काय? बसलो आपला हरी-हरी करीत." प्रसंग दोन. बँकेमध्ये महत्त्वाची कागदपत्रं जमा करायची होती. लांब लाईन असल्यामुळे मी समोरच्या व्यक्तीला विनंती केली की, जरा घाई असल्याने मला पुढे जाऊन द्या. ती व्यक्ती लगेच उत्तरली, "आम्ही काय इथं भजन करायला बसलोय काय?" वरील दोन्ही प्रसंग नामस्मरण आणि भजन याविषयीच्या समाजाच्या धारणेवर प्रकाश टाकतात. एकाच्या म्हणण्याप्रमाणे संसार करता येत नाही म्हणून निष्क्रियपणे एका जागेवर काळ कंठणार्याने हरीचं नामस्मरण करावं. दुसऱ्या प्रसंगाचा मथितार्थ असा की, ज्याला काहीही काम नाही त्यानंच भजन करावं. लोक अडाणी आहेत म्हणून अशा प्रकारची धारणा आहे का? तर तसंही नाही. नामस्मरण अंधश्रद्धा
मुक्तचिंतन
1 Aug 2022, 05:50
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसने रीडिंग वेल नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. ज्यामध्ये वैद्यकीय तज्ञ व्यक्तीच्या मनोभूमिकेच्या स्वरूपावरून पुस्तकाचे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. ती पुस्तकं वाचून वाचकांना त्याचा लाभ मिळतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगने केलेलं संशोधन सांगतं, की वाचनामुळे वयपरत्वे खालावणारी आकलन क्षमता शाबूत राहते. नियमित वाचणारे इतरांपेक्षा सरासरी दोन वर्षे अधिक जगतात. अर्थात एक-दोन दिवसांत हे सगळे फायदे मिळतील का? नाही. त्यासाठी नियमित वाचन गरजेचं आहे. संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2022/08/why-to-read-dnyaneshwari.html?m=1Muktchintanज्ञानेश्वरी का वाचावी?ज्ञानेश्वरी का वाचावी?, i don't know what to read Books to read Good books to read for adults Interesting books to read Best books to read in life
मुक्तचिंतन
28 May 2022, 04:05
लौकिकार्थाने ज्याला आपण भक्ती समजतो ती भक्ती सावरकरांनी कधी केली नाही. देशाची भक्ती मात्र शेवटपर्यंत त्यांच्या श्वासाचा अविभाज्य भाग होती. भारत मातेला, "तुजसाठी जनन ते जनन। तुजविन जनन ते मरण।।" असं विनवणारा देशभक्त एकच. "मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी प्रतिज्ञा करून शेवटच्या श्वासापर्यंत तिच्याशी प्रामाणिक राहणं काय असतं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे सावरकर चरित्र.बालपणापासून त्यांच्या मनात राष्ट्र वगळता कधी स्वत:च्या हिताचा विचार आलाच नाही. या भूमीने जितक्या म्हणून नररत्नांना जन्म दिला त्या सर्वांचा शिरोमणी म्हणजे सावरकर. राष्ट्र या विचारापासून ते कधीही विभक्त झाले नाहीत. त्यांनी स्वप्नं सुध्दा कायम मायभूमीच्या उत्कर्षाचीच पाहिली. सावरकरांच्या जयंती निमित्त आमचा विषेश लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर 👇🏻क्लिक करा. https://www.muktchintan.com/2021/05/versatile-savarkar.html?m=1Muktchintanबहुपेडी सावरकरmuktchintan, mind controlling, emotional balance, health, wealth, friendship, relationship, love, life, lifestyle, bhakti, devotion, geeta,
मुक्तचिंतन
9 May 2022, 04:42

मुक्तचिंतन
9 May 2022, 04:42
भगवद्गीता ही भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. मी नेहमीच जगभर भेटणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींना गीता भेट देतो. कारण माझ्याकडे देण्यासारखे गीतेपेक्षा मौल्यवान काहीही नाही आणि जगाला मिळवण्यासारखे गीतेपेक्षा मौल्यवान काहीही नाही. ज्याला जीवनाला आकार द्यायचाय त्याच्यासाठी गीता आहे. आज मोबाईल ऍप्स, युट्यब व्हिडीओज, पॉडकास्टस्, ईबुक्स आदी सगळ्या फॉरमॅटमध्ये गीता मोफत उपलब्ध आहे. लगेच सर्च करा आणि वाचायला लागा. 'पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती । सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे ॥' संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा https://www.muktchintan.com/2022/05/granth-guruvaticha-thavo.html?m=1Muktchintanग्रंथ गुरुवतीचा ठावोग्रंथ गुरुवतीचा ठावो, गीता का वाचावी, गीतेचे महत्व, गीतासार,gitasar, importance of geeta, must read book in the world, western writings on geeta, gita
मुक्तचिंतन
17 Mar 2022, 16:12
भारतीय संस्कृतीने सणांच्या माध्यमातून विज्ञानाला आपल्या जगण्याचे अविभाज्य माध्यम बनवले आहे. बर्याचदा साज अडाणी असल्याने त्याला त्यातला कार्यकारणभाव सांगितला गेला नाही. किंवा निरक्षरपणामुळे तो समजला नाही. विज्ञान आजही आहेच पण सांगता येत नाही. परंपरा मात्र जोमात टिकून आहेत. सुधारणावादाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कितीही गोळीबार केला तरी सनातन भारतीय संस्कृती नष्ट होणारी नाही. किंबहूना जे भारतीय संस्कृतीला संपवायला आहे तेच संपलेत. त्यात जसे बाहेरचे आहेत तसे आतलेही. कुर्हाडीचे दांडे. होळीच्या शुभेच्छा, असा दोन ओळींचा मेसेज लिहून मीही आपणांस शुभेच्छा देऊन मोकळा होणार होतो. परंतु आज माझ्या मुलालाच माहित नाही, की होळी का साजरी करतात?संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2022/03/why-holi-is-celebr.html?m=1Muktchintanहोळी का साजरी करतात?होळी का साजरी करतात, होळीची माहिती, होळीची कथा,why holi is cecebrated, holi information,
मुक्तचिंतन
14 Mar 2022, 01:59
आज समाजामध्ये शारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी सजगता निर्माण झालेली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर आहारातून वाढणारी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याविषयीही बरंच जनजागरण झालेलं आहे. पण मनाचं काय? जीवनसंग्रामात माणसाचं मन मजबूत असणं आवश्यक आहे. दुबळ्या मनाचा माणूस यशस्वी होऊ शकत नाही. कोणत्याही युद्धाचा निर्णय तलवार धारण करणाऱ्या मनगटामागचे मन किती मजबूत आहे यावर निश्चित होत असतो. मन मजबूत व्हायचं असेल तर मनाचं पोषण देखील व्हायला हवं. मात्र या विषयाकडं अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसतं आहे. दैनिक पुण्यनगरीतील आनंदयोग सदरातील आमचा हा लेख संपूर्ण वाचण्यासाठी खालील 👇🏻लिंकवर क्लिक करा https://www.muktchintan.com/2022/03/mental-diet.html?m=1Muktchintanमनाचा आहारHow to control your mind, how to be desciplined, how to be happy, mental diet, what is mental diet, how to regain mental health, mental health tips
मुक्तचिंतन
14 Mar 2022, 01:59

मुक्तचिंतन
31 Jan 2022, 16:04
एखाद्या गोष्टीविषयी अनाठायी आसक्ती म्हणजे ममत्व. अमूक एक गोष्ट माझ्या मालकीची आहे, म्हणून तिच्यावर माझाच अधिकार असावा, हा दुराग्रहातून ममत्व उभे राहते. वास्तविक ही मालकीची भावना कशातून जन्म घेते? खोट्या अहंकारातून. आपल्याला स्वत:च्या नसलेल्या गोष्टींचाही फाजील अहंकार असतो. जगामध्ये कोणत्याही गोष्टीवर आपला अधिकार नाही. जे काही आपण करतो ते कोणाचीतरी उसनवारी आहे. आपले लिहिणे,बोलणे, पैसा कमावणे, यामध्ये आपले योगदान फार नगण्य असते. आमचा दैनिक पुण्यनगरीतील हा संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2022/01/mamatva.html?m=1Muktchintanममत्वhow to control possesiveness, how to manage ego, ममत्व म्हणजे काय, अहंकार का वाढतो, ममत्व का वाढतो, ममत्व दूर करण्याचे उपाय, अहंकार कसा दूर करावा
मुक्तचिंतन
3 Jan 2022, 02:32
अवधान स्पष्ट होण्यासाठी आपले विचार स्पष्ट असावेत. मी कोण? हा उपनिषदांचा सनातन प्रश्न आहे. हा प्रश्न जर आपल्याला पडला, तर आपले विचार स्पष्ट होतात. त्यासाठी सत्साहित्याचे वाचन होणे आवश्यक आहे. संतसाहित्य आणि सत्साहित्य शब्द दिसायला सारखे झाले असले, तरी काही व्यक्ती लौकिकार्थाने संत नसूनही त्यांच्या साहित्यामध्ये माणूस उभा करण्याची ताकद असते. त्याचे वाचन झाले पाहिजे. वाचनानंतर चिंतन घडले पाहिजे. रोज आपण अनुभवलेल्या घटनांचा लेखा मांडला पाहिजे. आज आपले काय चुकले याचा आढावा रोजच्या रोज घेतला पाहिजे. आज हे चुकले म्हणून आता हे काम सोडून देतो असा विचार न करता स्वतःला माफ करून पुन्हा उद्या त्या कामासाठी उभे राहणे, हेच यशाचे गमक आहे. आजच्या दैनिक पुण्यनगरीतील आमचा हा प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा https://www.muktchintan.com/2022/01/avadhan.html?m=1
मुक्तचिंतन
1 Dec 2021, 16:54
शाब्बास गुरूजी - एक नवी प्रकाशवाटअज्ञान-तिमिरान्धस्यज्ञानांजन-शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः॥ज्ञानाच्या शलाकेने जो अज्ञानाचा अंधकार दूर करतो, नवी दृष्टी प्रदान करतो अशा गूरूला नमस्कार असो असे सांगणारा हा श्लोक. पण आजच्या काळाचा विचार करताना असे गुरू आणि गुरूविषयीच्या अशा प्रांजळ भावना पहायला मिळतात का? शिक्षकांविषयी फार बरे बोलण्या-ऐकण्याचे हे दिवस नाहीत. शिक्षण क्षेत्र हे व्रतस्थ लोकांसाठी नाही; तर धंदेवाईक लोकांसाठी आहे; असा समाजाचा समज झाला आहे. तसा तो होण्यामध्ये अर्थातच या क्षेत्राचेच योगदान आहे, हेही नाकारता येत नाही. अशा सगळ्या नकारात्मक वातावरणात आपल्या कर्तृत्व आणि कार्यानिष्ठेने ही नकारात्मता नष्ट करून सकारात्मकतेचे दिप उजळवणारे काही प्रकाशाचे बेटेही आहेत. पण त्यांच्याकडे डोळे उघडून पाहतो कोण?. संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2021/10/shabbas-guruji-ek-navi-praashvat.html?m=1Muktchintanशाब्बास गुरूजी - एक नवी प्रकाशवाटशाब्बास गुरूजी, उपक्रमशील शिक्षक,innotive teachers, active teachers, shabbas guruji, chaprak prakashan, ghanshyam patil, rajendra dighe, muktchintan,1,700Open in Telegram
मुक्तचिंतन
15 Sept 2021, 08:35
One grain of sand at a time. One task at a time.' By repeating those words to myself over and over, I accomplished my tasks in a more efficient manner
मुक्तचिंतन
1 Aug 2021, 05:03
सर्वप्रथम सर्वांना मैत्रीदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून पाळला जातो. मित्रांची यादी करायला सांगितली, तरआपली प्रत्येकाची यादी खूप मोठी होईल. पण जेव्हा खरंच वेळ येते, तेव्हा त्यातले किती कामाला येतात? याचा विचार केला तर मात्र पदरात काहीच पडत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सारा गाव मामाचा एक नाही कामाचा'. जो कामाला येतो तोच खरा मित्र. A Friend in need is a friend indeed. ही इंग्रजी म्हण त्यासाठीच तर निर्माण झाली. भारतीय तत्वचिंतनाने मित्र कोणाला म्हणावे? याविषयी फार मूलगामी चिंतन केले आहे. त्याकडे जर पाहिले, तर आपल्या लक्षात येते, की ज्यांना आपण मित्र समजतो ते फक्त आपले परिचित आहेत, मित्र नाहीत. काय आहेत नेमकी मित्राची लक्षणे? चला सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील👇🏻 लिंकवर क्लिक करा. https://www.muktchintan.com/2021/08/what-friendship-means.html?m=1Muktchintanमैत्री म्हणजे काय? मित्र कसा असावा?friendship day, friendship day status, what friendship means, who is true friend,मित्रलक्षण, मित्र कोणाला म्हणावे, खरा मित्र कसा ओळखावा, मित्र म्हणजे
मुक्तचिंतन
27 Jul 2021, 05:48
कविवर्य कुसुमग्रज म्हणतात,"अज्ञानाच्या अंधाऱ्या रात्रीना उजळून टाकण्याचे सामर्थ्य ग्रंथामध्ये असते. ग्रंथाच्या तेजातच क्रांतीची बीजे असतात. ग्रंथ आपल्याला माणुसकी आणि शांती शिकवतात. या क्रांतीचे, माणुसकीचे, शांतीचे, नवनवे वारसदार निर्माण करण्याचे काम ग्रंथ करतात." तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुस्तक हे संस्कृतीचे मस्तक असते असे म्हटले आहे. वि. स. खांडेकर यांनी पुस्तकांच्या जगात शिरले, की मनावरचे मळभ दूर होते याची ग्वाही दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर ग्रंथांनाच प्राण मानायचे. यशवंतराव चव्हाण यांनी ग्रंथ वाचनाने माणूस मोठा झाला नाही तरी शहाणा जरूर होतो असे सांगितले आहे. आपला वेळ बुद्धी आणि मन संस्कारित होण्यासाठी ग्रंथ वाचनावर भर दिला पाहिजे. श्रीकांत जाधवर यांचा हा संपूर्ण लेख वाचा खालील 👇🏻लिंकवर https://www.muktchintan.com/2021/07/Granth-mitra.html?m=1Muktchintanग्रंथ मित्रटॉप मराठी पुस्तके, काय वाचावे, how to read, what to read, reading, top marathi books, top seller marathi books, must read books, good reads,
मुक्तचिंतन
24 Jul 2021, 08:02
सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी आचार्य प्र.के.अत्रे म्हणतात," एकवेळ घरात दिवा नसला तरी चालेल पण ज्ञानाचा दिवा अर्थात ज्ञानेश्वरी घराघरात असलीच पाहिजे ." त्याप्रमाणे लेखक रमेश वाघ यांचे महाराष्ट्राचे विचारदुर्ग हे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे . वाचले गेले पाहिजे आणि त्याची पारायणे झाली पाहिजे इतके पुस्तक महत्त्वाचे आहे . हे पुस्तक कुणासाठी ? तर वाचणा-या प्रत्येकासाठी आहे. आजच्या एकूणच नैराशजनक काळात हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. साहित्य आणि संतसाहित्य यात नेमका काय फरक आहे ? मला वाटते उत्तम साहित्य हे वाचण्याचा विषय असून संत साहित्य हा पारायणाचा विषय आहे . तो अनुभवाचा विषय आहे . प्रत्येक वेळी नवनवीन अर्थ बोध होत जातो.लेखक रमेश वाघ यांनी लिहिलेली दहा चरित्रे अतिशय रसाळ भाषेत लिहिलेली आहेत. स्वतः रमेश वाघ हे किर्तनकार आणि उत्तम प्रवचनकार आहेत साहजिकच संत चरित्र लिहिताना संतांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटना, प्रसंग, कार्ये समोर ठेवून कमीत कमी शब्दांत उतरलेली हीMuktchintanप्रत्येक घरात असावे असे पुस्तक : महाराष्ट्राचे विचारदुर्गmuktchintan, mind controlling, emotional balance, health, wealth, friendship, relationship, love, life, lifestyle, bhakti, devotion, geeta,
Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.
How it works →Related Channels
Other channels in the same section of the catalogue.
