gram news
डॉ. शैलेंद्र देवळाणकर channel avatar

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

@skdeolankar

🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध h

ProjectsHIPolitics

4,516subscribers

Open the Channel

Latest posts

  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    22 Sept, 02:34

    29164Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    20 Sept, 04:04

    ब्रिक्स : अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्याला प्रतिउत्तर देणारी परिषद -डॉ शैलेंद्र देवळाणकर भारतात नुकत्याच पार पडलेल्या १८व्या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा लेखाजोखा मांडणारा डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा लेख आजच्या रविवार लोकमतने “हॉट टॉपिक” म्हणून प्रकाशित केला आहे. ब्रिक्सचं महत्त्व झपाट्याने वाढत आहे. विशेषतः बहुध्रुवीय विश्वरचना तयार करण्याच्या दृष्टिकोनातून, आणि अमेरिका व डॉलरच्या वर्चस्ववादाला आव्हान देण्याची क्षमता असणारी संघटना म्हणून ब्रिक्सकडे पाहिलं जात आहे. याची कारणं स्पष्ट आहेत. रशिया जगाची एनर्जी सप्लाय चेन डोमिनेट करतो. चीन जगाची रेअर अर्थ मिनरल्सची सप्लाय चेन डोमिनेट करतो. आणि भारत जगाची ह्युमन रिसोर्सेस व फार्मास्युटिकलची सप्लाय चेन डोमिनेट करतो. त्याचप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ भारत आहे. या तीन देशांचं एकत्र येणं हे निश्चितपणे पश्चिमी वर्चस्ववादाला आणि वसाहतवादी मानसिकतेला आव्हान देणारं आहे. याचं सविस्तर विवेचन आजच्या लोकमतमधील लेखात केलं आहे. वाचकांनी अवश्य वाचावा.
    49233Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    19 Sept, 10:04

    58543Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    19 Sept, 08:00

  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    18 Sept, 14:54

  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    17 Sept, 02:38

    869531Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    16 Sept, 09:01

    https://x.com/skdeolankar/status/2099724210000040094
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    15 Sept, 03:23

    1,15064Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    10 Sept, 05:39

    आजच्या दैनिक सकाळ मधील डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचा लेख अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि भारत लेखातील ठळक मुद्दे ट्रम्प प्रशासनाच्या बदलत्या एच-१बी व्हिसा धोरणाचा भारतावर थेट आणि व्यापक परिणाम होणार आहे. नव्या एच-१बी अर्जांसाठी प्रस्तावित केलेले १,०३,२६५ डॉलरचे शुल्क आणि नवीन निवड प्रक्रिया यामुळे भारतीय विद्यार्थी, नवपदवीधर युवक, आयटी व्यावसायिक तसेच सेवा-निर्यात क्षेत्रासमोरील अडचणी वाढणार आहेत. भारतीयांचा मोठा वर्ग आयटी, कन्सल्टन्सी आणि आउटसोर्सिंग क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षण घेऊन तेथेच करिअर घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवकांसाठी एच-१बीचा मार्ग अधिक येत्या काळात कठीण होणार आहे. मात्र, या निर्णयाकडे केवळ संकट म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. अमेरिकेवर अवलंबून राहण्याऐवजी भारताने आपल्या कुशल युवकांसाठी देशांतर्गत संशोधन, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, स्टार्टअप आणि जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण करणे आवश्यक आहे.
    1,48022Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    7 Sept, 07:43

    चीनचा धोकादायक “वॉटर बॉम्ब” डॉ शैलेंद्र देवळाणकर प्रसिद्ध मराठी दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या लेखात २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी पुरांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. या पुरांकडे हिमालयीन River System मध्ये चीनच्या हस्तक्षेपाच्या व्यापक पर्यावरणीय आणि भू-राजकीय संदर्भातून पाहण्याचा प्रयत्न लेखात केला आहे. तिबेटमध्ये मोठ्या प्रमाणावर धरणांची उभारणी, नद्यांचे प्रवाह वळविणे, बोगदे खोदणे आणि इतर पायाभूत प्रकल्प उभारणे यांमुळे एकमेकांशी घट्ट जोडलेली, अत्यंत नाजूक हिमालयीन पर्यावरण परिसंस्था विस्कळीत झाली असल्याचा लेखाचा मुख्य युक्तिवाद आहे.तिबेटी पठारातून उगम पावणाऱ्या नद्यांवर चीनने अनेक मोठे जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. पूर्व हिमालयीन प्रदेश हा भूकंपप्रवण आणि भूगर्भीयदृष्ट्या अत्यंत अस्थिर असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी चीनला दिला होता, याकडेही लेख लक्ष वेधतो. तरीसुद्धा, या संवेदनशील भूभागात मोठी धरणे आणि संबंधित पायाभूत प्रकल्पांची उभारणी सुरूच
    1,45063Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    30 Aug, 10:05

    आजचा रविवार दैनिक लोकमत सत्ता समीकरणे बदलली :बहुराष्ट्रवादी व्यवस्थेच्या दिशेने – डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक आखातामधील अमेरिका-इराण संघर्षाचा अग्नी तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी अद्याप शमलेला नाही. उलट या संघर्षाने बदलत्या जागतिक व्यवस्थेचे एक गंभीर वास्तव समोर आणले आहे. जुन्या दुसऱ्या महायुध्दा नंतरच्या बहुराष्ट्रवादी व्यवस्थेची पकड सैल होत असून जग एका नव्या, अधिक संघर्षमय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. आज जगाकडे नजर टाकली तर एकाच वेळी अनेक संघर्षभूमी धगधगताना दिसतात. रशिया-युक्रेन युद्ध पाचव्या वर्षात पोहोचले आहे. चीन-तैवान वाद अधिक संवेदनशील होत आहे. अमेरिका-इराण संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. चीन-जपान संबंधांमध्ये तणाव आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनचे दावे आणि इंडो-पॅसिफिकमधील वाढती स्पर्धा यामुळे आशियातील सुरक्षा समीकरणे देखील अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    27 Aug, 11:18

    दैनिक सकाळ मधील डॉ देवळाणकर यांचा विशेष लेख स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा रशिया-युक्रेन युद्धानंतर आणि आखातातील अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाची भावी व्यवस्था अधिकाधिक संघर्षमय होताना दिसत आहे. आखातामधील अमेरिका-इराण संघर्षाला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या संघर्षाने जुन्या बहुराष्ट्रवादी जागतिक व्यवस्थेच्या अस्ताची आणि एका नव्या, अधिक अस्थिर जागतिक व्यवस्थेच्या उदयाचे संकेत दिले आहेत. आज जगाकडे पाहिले तर एकाच वेळी अनेक संघर्ष धगधगताना दिसतात. अमेरिका-इराण संघर्ष अद्याप संपलेला नाही; चीन-तैवान तणाव कायम आहे, चीन-जपान संबंध ताणलेले आहेत आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान वादही मिटलेला नाही. या सगळ्यामुळे परस्पर विश्वास कमी होत असून प्रत्येक देश आपल्या सुरक्षेला आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देताना दिसत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेची तीन प्रमुख वैशिष्ट्ये असतील—परस्पर अविश्वास, वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि तीव्र
    1,680421Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    15 Aug, 00:25

  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    8 Aug, 16:57

    डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना ‘मराठवाडा सन्मान पुरस्कार २०२६’ परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंधांचे ख्यातनाम अभ्यासक, लेखक तसेच कुशल शिक्षण प्रशासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा आज संभाजीनगर येथे लोकमत मीडिया समूहातर्फे ‘मराठवाडा सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि MSFDAचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. देवळाणकर यांनी शिक्षण प्रशासनासोबतच परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सामरिक विषयांवरील लेखन व अभ्यासातून राष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळचे संभाजीनगरचे असलेले डॉ. देवळाणकर आज महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षण प्रशासक आणि अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून होत असलेला हा गौरव निश्चितच अभिमानास्पद आहे.
    3,980video2342Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    5 Jul, 09:11

    आजचा रविवार दैनिक पुढारी भारतासमोरील ‘लोन वुल्फ’ आणि ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादाचे वाढते आव्हान-डॉ शैलेंद्र देवळाणकर
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    28 Jun, 07:38

    रविवार लोकमत युद्धबंदी झाली; प्रश्न कायम - डॉ. शैलेंद्र देवळाणकर फेब्रुवारीच्या अखेरीस आखातामध्ये निर्माण झालेला संघर्ष १०० दिवसांनंतर तात्पुरत्या स्वरूपात का होईना शांत झाला आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः भारतासाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणावी लागेल. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चौदा कलमी शांतता करारावर स्वाक्षर्‍या झाल्या असून स्वित्झर्लंडमध्ये पुढील चर्चा सुरू झाली आहे. या करारामुळे इराणने हॉरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये लावलेले सागरी निर्बंध आणि नाकेबंदी मागे घेतली आहे. यामुळे तिथून खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि खतांची वाहतूक करणारी जहाजे आता पूर्ववत मार्गस्थ होतील. असे असले तरी या निमित्ताने येणार्‍या काळात या सामुद्रधुनीवरील भारताचे परावलंबित्व कसे कमी करता येईल आणि आपण या संपूर्ण संकटातून काय बोध घेतला पाहिजे, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    11 May, 06:10

    https://youtu.be/5FN3_bxiFSg
    YouTubeCrude oil price| Dr. Shailendra DeolankarEnjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
    3,45031Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    21 Apr, 05:34

    अमेरिकेच्या नाकेबंदीची मिमांसा आणि परिणाम - डॉ. शैलेंद्र देवळाणकर आखातातील संघर्ष आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. हे वळण धोक्याची ठरणार की शांततेचे, याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा वाद आता अथांग समुद्रापर्यंत जाऊन पोहोचला आहे. किंबहुना, समुद्र हाच आता या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू झाला आहे. २८ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या संघर्षाने जगाने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी नाट्यमय वळणे घेतली आहेत . विशेषतः १३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ म्हणजेच हॉर्मुझची समुद्रधुनी ब्लॉक करण्याचा घेतलेला निर्णय धाडसी असला तरी तो तितकाच वादग्रस्त आहे. तसेच ट्रम्प यांच्या या पावलामुळे जागतिक सुरक्षिततेची आणि अर्थव्यवस्थेची चिंता अनेक पटींनी वाढवली आहे.
    3,96010Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    14 Apr, 09:18

    3,5601831Open in Telegram
  • डॉ. शैलेंद्र देवळाणकर

    6 Apr, 07:30

    रविवार लोकमत आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता दुसर्‍या महिन्यात प्रवेश केला आहे. आज संपूर्ण जगासमोर एकच कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा संघर्ष आता शांततेच्या मार्गाने सुटणार की अधिक चिघळत जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी विधाने करत असल्याने याविषयीचा संशयकल्लोळ वाढत चालला आहे. तथापि, अलीकडे त्यांनी केलेली विधाने या युद्धाची पुढील दिशा दर्शवणारी आहेत. ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा दावा करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू. ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या ‘क्रॉस हॉल’मधून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. येणार्‍या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर इतके भीषण हल्ले करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे
    4,10092Open in Telegram
Download the series as CSV
A feedback bot for your channel — free

Followers write to the bot, you answer by reply, your account stays hidden. Created in one tap.

How it works →
Create the bot